Sunday, August 6, 2023

जयंत पाटील भाजप च्या वाटेवर ?

वेध माझा ऑनलाईन। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी हा दुसरा सर्वात मोठा धक्का असणार असल्याचं सांगितलं जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. काल सकाळीच ही भेट झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील जेडब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्येच जयंत पाटील यांची अमित शाह यांच्याशी भेट घडवून आणल्याची चर्चा आहे.



No comments:

Post a Comment