वेध माझा ऑनलाइन । आज विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान आ पृथ्वीराजबाबा व देवेंद्र फडणवीस यांच्यात भिडे याना गुरुजी का म्हणतात या विषयावरून चांगलीच चकमक झाली मात्र फडणवीसांनी याचे उत्तर देताना आ चव्हाण यांची खिल्ली उडवत त्यांचा अक्षरश क्लिन बोल्ड केल्याचे पहायला मिळाले
राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू आहे आज संभाजी भिडे यांच्या महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याच्या मुद्यावरून आ पृथ्वीराज चव्हाण पुन्हा चर्चा करताना दिसले... यावेळी भिडेंना गुरुजी का म्हणता?...त्यांच्या त्या नावाचा काही पुरावा आहे का?...असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला...त्याचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...गुरुजी हे त्यांचे नाव आहे...तुम्हाला पृथ्वीराज बाबा म्हणतात ...मग तुम्हाला बाबा का म्हणतात... याचा पुरावा मी मागू का...? असा उलटा सवाल करत त्यांनी पृथ्वीराज बाबांचा त्यावेळी अक्षरशः क्लिन बोल्ड केला...
मताच्या राजकारणासाठी पृथ्वीराजबाबा या विषयाला धरून बोलत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला ...
दरम्यान पृथ्वीराज बाबांनी भिडे गुरुजींच्या महात्मा गांधीबाबतच्या केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भिंडेना अटक करण्याची मागणी केली होती त्यांनतर पृथ्वीराज बाबांना नांदेड च्या एका युवकांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती
आज पुन्हा विधिमंडळ कामकाजावेळी पृथ्वीराज चव्हाण व फडणवीस यांच्यात भिडेंच्या नावाच्या मुद्यावरून चकमक पहायला मिळाली त्यावेळी फडणवीसांनी उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण यांची खिल्ली उडवत त्यांचा क्लिन बोल्ड केल्याची चर्चा सध्या सुरू आहे या एकूणच चर्चेचा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे
No comments:
Post a Comment