वेध माझा ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सातारा येथील सैनिक स्कूलच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा सातारा दौरा नियोजित नसल्याने शासकीय अधिकाऱ्यांची तसेच राजकीय कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ पहायला मिळाली दरम्यान खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर भरकटले म्हणून ते साताऱ्यातील सैनिक स्कुल येथे लँड करण्यात आले असे समजते
दरम्यान आधीही अशाच प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चॉपर अडथळ्यात अडकले होते. जळगाव मध्ये आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमादरम्यान देखील मुख्यमंत्र्यांचे चॉपर इतरत्र उतरावे लागले होते.दरम्यान मुख्यमंत्री सध्या महाबळेश्वर दौर्यासाठी आल्याचे समजते
सातारा जिल्ह्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुळ गाव आहे. या ठिकाणी त्यांची शेती देखील आहे. आपल्या शेतात काम करताना मुख्यमंत्र्यांना या आधी देखील पाहण्यात आले होते. मुख्यमंत्री काही दिवस दरे या त्यांच्या गावात मुक्काम करणार आहेत. तसेच या भागातील शेतकऱ्यांना भेटून बांबू लागवडीसाठी ते प्रोत्साहन देणार आहेत. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात मुख्यमंत्री स्वत: लागवड करणार आहेत.
No comments:
Post a Comment