Thursday, August 10, 2023

कराडचे मुख्याधिकारी म्हणून संजय गायकवाड पाहणार कामकाज ; शंकर खंदारे यांची अकोला येथे प्रमोशनवर बदली ;

वेध माझा ऑनलाईन। कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांची अकोला महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे त्यामुळे कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून त्यांना आजपासून कार्यमुक्त करण्यांत आल्याचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश आहेत पुढील आदेश येईतोपर्यंत त्यांच्या जागी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड हे कामकाज पाहणार आहेत 

शंकर खंदारे हे कराड पालिकेत मुख्याधिकारी म्हणून आल्यापासून येथील कामकाजात तसे फारसे रमलेच नाहीत त्यांच्याबाबत अनेकांचे वाद विवाद होण्याचेच प्रसंग होऊ लागले होते त्यांनी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा बऱ्याच दिवसाचा थटलेला पगार देऊन शब्दाला जागणाऱ्या वृत्तीचे दर्शन देत पालिका कर्मचाऱ्यांच्या विश्वास संपादन केला होता त्यांनी आपली केबिन पालिकेच्या नवीन इमारतीमध्ये तयार करून घेतली होती तरीही त्यांची प्रमोशनवर बदली होणार अशी चर्चा होतीच आणि आज अकोला येथे ते प्रमोशनवर अतिरिक्त आयुक्त या पदावर बदली घेऊन चालले असल्याचे नक्की झाले आहे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड हे पुढील आदेश येईपर्यंत कराडचे मुख्याधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत
संजय गायकवाड यांनी फलटण मध्ये पहाटेच्या वेळी शहरातून चालवलेली अतिक्रमण हटाव मोहीम राज्यभर चर्चेत राहिली होती

No comments:

Post a Comment