वेध माझा ऑनलाइन - नुकतीच कराड शहराची वार्ड रचना जाहीर झाली अनेकांनी आपली उमेदवारी या निमित्ताने चापचायला सुरुवात केली आहे अनेकांची बाशिंग बांधून तयारही आहेत त्यापैकी काहींना कराडकर पुन्हा पालिकेत नगरसेवक म्हणून पाहू इच्छित नाहीत... तर काहीजण मात्र पालिकेत आवर्जू्न पाहिजेत अशी लोकांची इच्छा दिसते आहे माजी नगरसेवक सुभाषकाका पाटील यांची पालिकेत पुन्हा एन्ट्री व्हावी...शहराला त्यांची आता खरी गरज असल्याची भावना "लोकशाही आघाडीवर' प्रेम करणाऱ्याकडून व्यक्त होताना दिसतेय...
काही महिन्यांपूर्वी लोकशाही गटाची पत्रकार परिषद झाली त्यामधून माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील संबोधित करणार ही पत्रकारांसाठी मोठी पर्वणी होती... कारण अनेक नेते पत्रकार परिषदेत बोलतात... मात्र अभ्यासू बोलणे आणि वेळ पडली तर आपले सहकारी असोत किंवा विरोधक त्यांना शहराच्या भल्यासाठी खडे बोल सूनवणारे सुभाषकाकासारखे हातावरच्या बोटाईतकेच दिसून येतात... शहराची अचूक नाडी जाणणारे सुभाष काकांसारखे नेते कमी आहेत... त्यामुळे काका रिटायर्ड होऊ नका तुमची शहराला गरज आहे...यावेळी पुन्हा पालिकेत या...अशी हाक "लोकशाही' मानणाऱ्यांकडून आता येत आहे...जिल्ह्यातील कोविड ची परिस्थिती हाताबाहेर जातेय असे वाटताच अजितदादांना सातारा जिल्ह्यात कोविड कंट्रोल करण्यासाठी बोलावण्यात आले होते...त्याच धर्तीवर बक्षीस मिळवण्याच्या नादात शहरातील रखडलेली कामे तशीच अडकवून शहराच्या विकासाचा विचका झाल्याची स्थिती पुन्हा सुधारण्यासाठी काका पालिकेत हवेत असे आता "लोकशाही' मानणारे बोलताना दिसत आहेत...
काही महिन्यांपूर्वी शहरातील लोकशाही गटाची पत्रकार परिषद झाली लोकशाहीचे मावळते अध्यक्ष सुभाषकाका पाटील यांनी लोकशाही आघाडीचे नूतन अध्यक्ष जयंतकाका पाटील यांच्यासह गटाच्या नवीन बॉडी ची घोषणा केली
यावेळी त्यांनी शहराच्या कारभाराविषयीची आपली मते आपल्या हटके स्टाईलने
मांडली...त्यामध्ये त्यांनी नाव न घेता काही "सेवकांना' चपराक देत नगरसेवक पदाची जबाबदारी काय असते...लोक मेहेरबान का म्हणतात...त्याचा अर्थ काय...हे सांगत नगरसेवक व गटनेत्याने रोज पालिकेत हजर असणे गरजेचे आहे असे सांगितले होते...गटनेता म्हणून सौरभ पाटील यांचे कौतुक करताना, दुसरीकडे "नेता' लोकांमधून निवडून येऊन सभागृहात आला पाहिजे हे देखील त्यांनी आपल्याच गटाच्या गटनेत्यांची निवड करताना म्हणजेच जयंतकाका पाटील यांच्या निवडीवेळी सांगितले होते हे विशेष...आणि हे काकाच बोलू शकतात...स्पष्ट आणि परखड...त्याचवेळी पार्टी मीटिंगची शिस्त सांगून त्याबाबतचे महत्वही त्यांनी विशद केले होते... कोविड सारख्या महामारीत सहा ,सहा... महिने गायब होऊन केवळ निवडणूकीपूरते लोकांसमोर येणाऱ्या व शहर अडचणीत असताना जबाबदारी झटकणाऱ्यां नेते म्हणवणाऱ्यांचे कानदेखील त्यांनी त्यावेळी उपटले होते... स्पष्ट आणि धडधडीत बोलणारा असा नेता एखादाच......
त्यांनी 2016 साली आमचं गणित चुकलं आता आम्हाला कोणी गृहीत धरू नये असे सांगून...लोकशाही गटाचे याच्याशी जुळणार... की त्याच्याशी जुळणार...या शहरात सुरू असलेल्या चर्चेला त्यांनी त्यावेळी विराम दिला होता...पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले होते...कारभाराचा तमाशा झालाय असे स्पष्ट सांगत चुकीच्या पुढारपणावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवत आत्तापर्यंत शहरात योग्य कामकाज झाले नाही हेही बोलून दाखवले होते...नगराध्यक्षांवर तर त्यांनी थेटच टीका केली होती... महत्वाचे म्हणजे माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव याच्या नगराध्यक्षा पदाच्या कारकिर्दीचे त्यांनी त्यावेळी आवर्जून कौतुक केले होते...काही दिवसांपूर्वी जनशक्तीचे अध्यक्ष अरुण जाधव व शारदाताई जाधव यांचे फोटो आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या फ्लेक्स वर झळकले होते त्यातून जाधव गटाची भविष्यातील पालिका निवडणुकीतील भूमिका पृथ्वीराज बाबा यांच्या बाजूने स्पष्ट झाली होती अशी चर्चा असतानाच सुभाषकाकांनी शारदाताईंच्या नगराध्यक्षापदाच्या कारकिर्दीचे कौतुक केल्याने पालिकेच्या निवडणुकीत भविष्यात हे दोन गट एकत्र येणार असल्याबाबत काकांनीच बोलता बोलता संकेत दिले की काय..? अशीही चर्चा त्यावेळी होती... या दोन गटाच्या माध्यमातून कराड दक्षिण-उत्तर चे आमदार एकत्र येतील असेही त्यावेळी बोललं गेलं...असो...
सुभाष काका हे शहराचा सखोल अभ्यास असणारे नेते आहेत त्यावेळच्या झालेल्या पत्रकार परिषदेत तमाशा शब्द वापरून कारभाराचे वाभाडे काढताना त्यांनी शहराचा कल जाणून घेऊनच हे वक्तव्य केले असावे... आता आमच्याकडून लोकांना अपेक्षा आहे आम्हाला कोणी गृहीत धरू नये असेही त्यांनी त्याचवेळी ठामपणे बोलूनही दाखवले होते... स्पष्ट बोलून विरोध करणे किंवा समर्थन करणे हा त्यांचा स्वभाव... त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासन आणि राजकारण यांचा समतोल राखत विकासकामे केल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यांच्यावर विरोधकांकडून अनेकवेळा टिकादेखील झाल्या आहेत...वचक असणारे नेते म्हणून ते शहराला परिचित आहेत... त्यांचा अभ्यास आणि नेतृत्व याची शहराला असणारी सध्याची गरज याचा सर्वतोपरी विचार करून त्यांनी पालिकेत मोठ्या गॅप नंतर आता पुन्हा एन्ट्री करावी अशी भावना "लोकशाही'वर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाकडून व्यक्त होताना दिसतेय...
No comments:
Post a Comment