वेध माझा ऑनलाइन - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून सुरू असलेली चौकशी संपली आहे. फडणवीस यांची जवळपास दोन तास चौकशी सुरू होती. देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यात आली. पोलीस बदली अहवाल फुटला होता, त्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. याआधीदेखील फडणवीस यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. डीसीसी, एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली.
मुंबई पोलिसांकडून देवेंद्र फडणवीस यांना याआधीदेखील चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्याला उत्तर दिले नव्हते. त्यानंतर पोलिसांनी फडणवीस यांची आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी दुपारी बारा वाजल्यापासून चौकशी सुरू केली.
मुंबई पोलिसांनी कोणते प्रश्न?
राज्य गुप्तचर विभागाची गोपनीय माहिती तुम्हाला कशी मिळाली? माहितीचा स्रोत काय? पेनड्राइव्हमधून आणखी काय माहिती मिळाली असे प्रश्न मुंबई पोलिसांनी विचारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फडणवीसांच्या घरात भाजप नेत्यांची गर्दी
मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या घरी चौकशी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज सकाळपासून भाजप नेत्यांनी फडणवीस यांच्या घरी गर्दी केली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे आदींसह इतर नेते, कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.
भाजपकडून राज्यभरात आंदोलन
देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्यानंतर भाजप आक्रमक झाली होती. मुंबईसह राज्यभरात भाजपकडून सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. नाशिक, बीड, नंदुरबार, अकोला, परभणी, हिंगोली, अमरावती बुलढाण्यासह यवतमाळमध्येही भाजपकडून सरकार आणि पोलिसांच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली.राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून सुरू असलेली चौकशी संपली आहे. फडणवीस यांची जवळपास दोन तास चौकशी सुरू होती. देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यात आली. पोलीस बदली अहवाल फुटला होता, त्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. याआधीदेखील फडणवीस यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. डीसीसी, एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली.
Devendra ji yaani kay uttar file he sammu shakel ka?
ReplyDelete