Friday, August 11, 2023

काँग्रेसचे नेते भाई जगताप बैठकीसाठी आज कराडात ; भाईंचे स्वागत करणाऱ्या बॅनर वर कराड, पाटण च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावेच नाहीत ; अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर ?; कराडात चर्चा...!

वेध माझा ऑनलाईन।  होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर कराड, पाटण  तालुक्याची आढावा बैठक आज काँग्रेसने कराडच्या पंकज हॉटेल येथे आयोजित केली होती या बैठकीसाठी आज काँग्रेस आमदार भाई जगताप आले होते ते  येणार म्हणून त्यांच्या स्वागताचे बॅनर तयार करण्यात आले होते त्या बॅनर्स वर प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावेच नाहीत असे निदर्शनास आले आहे त्यामुळे भाई जगताप यांच्या समोरच काँग्रेस अंतर्गत असणारे राजकारण चव्हाट्यावर आल्याच्या प्रतिक्रिया यानिमित्ताने उमटू लागल्या आहेत 

काँग्रेस नेते भाई जगताप आज कराडात आले होते काँग्रेसची सध्याची इथली अवस्था काय व कशी आहे? येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत हीच अवस्था पुढे कशी असू शकेल? याबाबत निरीक्षण करण्यासाठी तसेच या भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी ते आले होते त्यासाठीच त्यांच्या उपस्थितीत कराड व पाटण विधानसभा मतदार संघाची बैठक पार पडली  दरम्यान या आढावा बैठकीवेळी लावला गेलेला जो बॅनर होता त्याचा फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे त्या बॅनरवर कराड व पाटण मतदार संघातील प्रमुख नेत्यांची नावेच नसल्याचे निदर्शनास आले आहे हे मुद्दामहुन केलंय की चुकून घडलंय याचे उत्तर आयोजकांनी देणे गरजेचे असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे मात्र असले घाणेरडे राजकारण जाणूनबुजून कोण करतंय का? याबाबतही सध्या चर्चा आहे बॅनर च्या निमित्ताने काँग्रेस अंतर्गत चालणारे हे राजकारण भाई जगताप यांच्या समोरच आल्याने सोशल मीडियावर नाराजीच्या कमेंटचा पाऊसही पडताना दिसत आहे 

काँग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्याचे नेते भानुदास माळी मुस्लिम अल्पसंख्यांक नेते राज्याचे उपाध्यक्ष झाकीर पठाण अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे या बॅनर वर का नाहीत? अशी चर्चा आता सुरू झाली आहे या कार्यक्रमाचे नियोजन तालुकाध्यक्ष मनोहर शिंदेंनी केल्याचे समजते

सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून चर्चेत असायचा मात्र सध्या जिल्ह्यात भाजपची मुसंडी पाहता काँग्रेसला चिंता करण्याची गरज आहे की काय?असा प्रश्न पडतो त्यात काँग्रेस ची अवस्था उचलून पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करण्याची नक्कीच गरज आहे असे असताना कोणत्याही फालतु कारणाने पक्ष अंतर्गत राजकारण होता कामा नये याची खबरदारी त्या त्या नेत्यांनी घेणे गरजेचे असते निवडणुका पुढील वर्षी होतील अशी शक्यता आहे त्या पार्शवभूमीवर प्रत्येक पक्ष चाचपणी करत आहे किंग्रेसची आज अशीच चाचपणी बैठक होत असताना या बैठकीच्या पार्शवभूमीवर तयार करण्यात आलेल्या बॅनर वर ज्या भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक आहे तिथल्या महत्वाच्या नेत्यांची नावे वगळून झालेल्या अंतर्गत घाणेरड्या राजकारणाचा फटका पक्षाला बसण्याची भीती पक्षाच्या निष्ठवंतांना आहे म्हणून असलं घाणेरड राजकारण करणाऱ्याना योग्य समज द्या... अशा संतप्त प्रतिक्रीया काँग्रेसमधील काहीजण व्यक्त करताना दिसत आहेत

No comments:

Post a Comment