वेध माझा ऑनलाइन । ठाकरे गटाचे पाय आणखी खोलात जाणार असं चित्र दिसत आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाच्या पाच खासदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. या पाचही खासदारांनी व्हीप पाळला नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे. शेवाळे यांच्या या विधानानंतर ठाकरे गटात खळबळ उडालेली असतानाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. शिरसाट यांनी थेट ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार असल्याचं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संजय शिरसाट मीडियाशी संवाद साधत होते. कोव्हिड घोटाळ्यातील संशयित आरोपी सुजीत पाटकर यांनी ईडीच्या विरोधात साक्ष दिली आहे. ईडीने जबरदस्तीने जबाब नोंदवून घेतला. मला धाक दाखवून माझा जबाब नोंदवून घेतल्याचं सुजीत पाटकर यांनी म्हटलं आहे. त्याबाबत संजय शिरसाट यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मोठे बॉम्बच टाकले. तुम्हाला उगाच चौकशीसाठी बोलावलं का? उगाच कस्टडीत घेतलं का? मारून आरोप सिद्ध करता येत नाही. तुमच्याकडे कागदपत्र असेल गुन्ह्यात अडकला असेल तरच शिक्षा होते, असं संजय शिरसाट म्हणाले.
No comments:
Post a Comment