वेध माझा ऑनलाइन - राज्यातील राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काल निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला नवं नाव आणि नवं चिन्ह दिल्यानंतर आता शिंदे गटालाही नवं चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या पक्षाचं नाव बाळासाहेबांची शिवसेना असून ढाल-तलवारीचं चिन्ह देण्यात आले आहे.
शिंदे गट - बाळासाहेबांची शिवसेना - ढाल-तलवार
ठाकरे गट - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - धगधगती मशाल
No comments:
Post a Comment