वेध माझा ऑनलाइन - कराड येथील जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर आणि विद्यालय यांच्या वतीने शालेय विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम अंतर्गत तीन दिवसीय शिबीर नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले
शिबिराचे उद्घाटन जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.शिरीष गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. सचिव अनिल कुलकर्णी, संचालक डॉ.प्रकाश सप्रे, दीपक कुलकर्णी, सुनील मुंद्रावळे, श्रीपाद कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
कलाविष्कार २०२२ या निवासी शिबिरात १६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कला व कलाकार यांचा प्रत्यक्ष सहवास मिळाला तसेच त्यांना त्या कलाकारांचे व्यक्तिमत्त्व, जवळून अनुभवताही आले.
विविध सदरातून वेगवेगळ्या कलाकारांनी यावेळी आपली कला सादर करत आपले अनुभवदेखील शेअर केले त्यातून उपस्थित विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन देखील करण्यात आले
तीन दिवसीय चाललेल्या या निवासी शिबिराचा नुकताच समारोप झाला
शिबिरात वेगवेगळ्या केश रचना, वैशिष्ट्यपूर्ण खेळांची माहिती, मूर्तिकला मूर्तीशास्त्र विषयी मार्गदर्शन तसेच कराडमधील प्रीतिसंगम हास्यक्लबच्यावतीने हास्यकलाचे सादरीकरण करण्यात आले.छायाचित्रे त्याचे तंत्र, तसेंच हस्ताक्षर लेखन पद्धती,याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. संगीत रजनी या कार्यक्रमातुन यावेळी बहारदार गाणी सादर झाली त्याचप्रमाणे दांनपट्टा लाठीकाठी भाला व कुऱ्हाड चालवणे अशा साहसी खेळाचे सादरीकरण देखील यावेळी करण्यात आले शिल्पकलेचे सुंदर सादरीकरण देखील यावेळी झाले विविध प्रकारची वाद्ये व त्याची माहितीही या शिबिरातून विद्यार्थ्यांना देण्यात आली अशा विविधांगी कलाविष्काराने हे शिबीर संपन्न झाले
उत्कृष्ठ शिबीरार्थी म्हणून कु. वरदा चव्हाण, कु. मधुजा बर्वे,आणि चि. समर्थ करपे या विद्यार्थ्यांना यावेळी गौरवण्यात आले
संस्थेचे सर्व संचालक, मुख्याध्यापक विजय कुलकर्णी यांच्या कल्पनेतून तसेच शिबिराध्यक्ष दीपक पाटील, स्वागताध्यक्ष सौ.सोनाली जोशी यांच्या नियोजनातून हे शिबीर यशस्वी पार पडले
शिबिर यशस्वी होण्यासाठी सौ.गौरी जाधव, सौ. रुपाली पाटील, सौ अबोली फणसळकर, सौ अनुराधा कुलकर्णी सौ.स्मिता पतंगे सुवर्णा काटकर, दिपाली काकडे, शिल्पा भुतकर, अवधूत तांबवेकर राहुल मोरे, प्रशांत मुंढेकर, विद्यादेवी जाधव, स्वाती जाधव, प्रतिभा चव्हाण यासह
संस्थेचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी पालक यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment