Saturday, October 22, 2022

एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न ; उंब्रज येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद ;

वेध माझा ऑनलाइन -  उंब्रज येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आज शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरीचा प्रयत्न करण्यात आला. कटावणीने उचकटून एटीएम मधील रोकड रक्कम लंपास करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला अशी माहिती उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली. चोरट्यांनी उंब्रज येथील एटीएमवर डल्ला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला खरा, मात्र एटीएम मॉनिटरिंग एजन्सीच्या सतर्कतेमुळे पोलीस घटनास्थळी तात्काळ हजर झाले. याबाबत सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले आहे अधिक तपास उंब्रज पोलीसांकडून सुरू आहे.

No comments:

Post a Comment