पहाटे 6.30 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यांनतर तब्बल 2 तास कार्यक्रमाची रंगत वाढत गेली सादर झालेल्या सुरील्या सादरीकरणाने कराडकर रसिकप्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले दिवाळीची सुरुवातच पहाटेच्या संगीतमय सुरांनी सजली त्यामुळे शुभ-दीपावली हा संदेश प्रत्यक्ष सादर गायन कलेतूनच जणू अनुभवायला मिळाला अशी बोलकी प्रतिक्रिया काही रसिक प्रेक्षकांनी यावेळी दिली
दरम्यान या कार्यक्रमात तबला साथ विनायक हसबनीस यांनी दिली तर हार्मोनियमची साथ सारंग सांभारे यांनी दिली साईड रिदम दिलीप आगाशे व गायन साथ सौ नियती आपटे यांनी दिली.
कार्यक्रमाला माजी नगरसेवक सौरभ तात्या पाटील, घनश्याम पेंढारकर तसेच डॉ. मिलिंद पेंढारकर डॉ. अजय ब्रम्हनाळकर मुकुंद चरेगावकर यांच्यासह शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी संस्थेचे संचालक प्रशांत कुलकर्णी यांनी कलाकारांची ओळख करून दिली त्यानंतर संचालक अरुण प्रभुणे, ऍड. विक्रम कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत साने सौ पी डी कुलकर्णी बाई, सौ विनिता पेंढारकर, श्री अवधूत कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवर व कलाकारांचा सन्मान केला संस्थेचे अध्यक्ष जयंत बेडेकर यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कराडमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रम सादर झाला त्यामुळे शहरातील रसिक प्रेक्षक व कलाकारांसाठी ही पर्वणीच होती या सर्व रसिक प्रेक्षकांनी देखील समस्त ब्राम्हण सामाजिक संस्थेचे आभार मानले व अशा उपक्रमाचे प्रत्येकवर्षी आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत सादर झालेल्या कार्यक्रमाचे भरभरून कौतुकही केले
No comments:
Post a Comment