वेध माझा ऑनलाइन - अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेच्या दोन्ही गटांत शहकाटशहाचं राजकारण सुरु आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास आणखी 15 दिवसांपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. राजीनामा स्वीकारण्यास तांत्रिक अडचण असल्यानं लटके यांच्या उमेदवारीबाबत ठाकरे गटासमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्ल्क असताना राजीनामा स्वीकारला गेला नसल्यानं लटकेंची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
ठाकरे गट (शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन ठाकेरंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या महानगरपालिकेत काम करतात. त्यांनी साधारणतः एक महिन्यापूर्वी राजीनामा दिला होता. परंतु, तो राजीनामा अटीत बसत नसल्याची सबब देत महापालिकेकजून नामंजूर करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी ऋतुजा लटके यांच्याकडून दुसरा राजीनामा सादर करण्यात आला. सध्या मुंबई महापालिका शुक्रवारी सादर झालेल्या लटकेंच्या दुसऱ्या राजिनाम्यावर कार्यवाही करत आहे. पण, अद्याप 6 विभागांचं नाहरकत प्रमाणपत्र राजिनाम्याकरता मिळणं प्रलंबीत आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर महापालिकेत कार्यरत असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनामा अर्ज दाखल केला. पण त्यामध्ये त्यांनी काही अटी घातल्या होत्या. जर निवडणूक जिंकले तर स्वेच्छानिवृत्ती घेईन. अन्यथा निवडणूक हरल्यास सेवा सुरु ठेवण्याबाबतची अट ऋतुजा लटके यांनी आपल्या राजीनाम्याच्या अर्जात घातली होती. त्यामुळे राजीनामा अटीत बसत नसल्याची सबब देत महापालिकेनं नामंजूर केला. त्यानंतर गेल्या शुक्रवारी ऋतुजा लटकेंनी दुसरा राजीनामा अर्ज दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांचा स्वेच्छानिवृत्ती राजीनामा मंजूर होण्याची प्रक्रीया तब्बल 6 महिन्यांपर्यंत चालते. ऋजुता लटके यांचा राजीनामा लवकरात लवकर मंजूर करण्याचं शासनानं ठरवलं तरी केवळ दोन दिवसांत ही प्रक्रीया पार पाडणं आव्हानात्मक आहे.
No comments:
Post a Comment