वेध माझा ऑनलाइन - खाजगी बस व टँकरचा भीषण अपघात झाल्याने बस पेटली व त्यात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 30 च्यावर प्रवासी जखमी झाल्याची घटना नासिक औरंगाबाद मार्गावर शनिवारी पहाटे घडली
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक औरंगाबाद मार्गावर नंदुर नाक्याजवळ खाजगी बस आणि टँकरचा भीषण अपघात झाला या अपघातात बस पेटल्याने बसमधील बारा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 30 च्या वर प्रवासी जखमी झाले आहेत मिरची हॉटेल जवळ चौफुलीवर पहाटे पाच वाजता ही घटना घडली ही बस यवतमाळ होऊन मुंबईकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली यावेळी बसमधील सर्व प्रवासी झोपेत होते बस स्लीपर कोच असल्याने प्रवाशांना उठण्यास वेळ लागला यातील जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तसेच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले याआगीत बस पूर्ण जळून खाक झाली असून सापडलेले मृतदेह पूर्णपणे जळाल्याने ओळख पटवण्यासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे.. अधिक तपास पोलीस यंत्रणा करीत आहे
No comments:
Post a Comment