वेध माझा ऑनलाइन - व्हाट्स अप कडून आपल्या युझर्ससाठी अनेकदा नवनवीन अपडेट्स लाँच केले जातात. ज्यामुळे युझर्सना चॅटिंगमध्ये चांगला अनुभव मिळतो. आताही व्हॉट्सऍप आणखी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे, जे खास ग्रुप चॅटिंगसाठी उपयुक्त ठरणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की,व्हाट्स अप कडून लवकरच आपल्या जुन्या फीचरमध्ये एक नवीन अपडेट दिला जाणार आहे. ज्या अंतर्गत कोणत्याही ग्रुपमध्ये एक हजार चोवीस मेम्बर्सना ऍड करता येईल.WABetaInfo या वेबसाईटवरील माहितीनुसार, व्हाट्स अप ने हे फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी सादर केले आहे, जे अँड्रॉइड आणि आयोएस युझर्ससाठी असेल.व्हॉट्सऍपकडून कोणत्याही ग्रुपमध्ये 512 पर्यंत मेम्बर्सना ऍड करण्याची सुविधा सुरू केली होती. WABetaInfo वेबसाईटने याबाबत एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये या नवीन फिचरविषयी कळू शकेल. युझर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन व्हाट्स अप कडून अनेक नवनवीन फीचर्स लाँच केले जातात. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी पेंडिंग ग्रुप पार्टीसिपेंट फीचर आणत आहे. मात्र सध्या हे फीचर डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. मात्र भविष्यात ते युझर्ससाठी आणले जाईल.
No comments:
Post a Comment