वेध माझा ऑनलाईन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज साेमवारी सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आले आहेत अशी माहिती मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी अचानक रात्री उशिरा हा दौरा ठरला त्यांचे हेलिकॉप्टरने सातारा जिल्ह्यात आगमन झाले.सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी व जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी त्यांचे स्वागत केले. आज मुख्यमंत्री आपल्या घरच्या लोकांना वेळ देणार असल्याचे समजते
दरम्यान,ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री शिंदे आलेल्या हेलिकॉप्टर मधून त्याचवेळी महत्वपूर्ण बैठकीसाठी ठाण्याला रवाना झाल्याची माहितीही मिळत आहे
No comments:
Post a Comment