वेध माझा ऑनलाइन - उद्यापासून नोव्हेंबर महिना सुरु होत आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीसहीत अनेक वस्तूंच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे.
अलीकडच्या काळात जागतिक बाजारपेठेमध्ये गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सरकारने गॅसचे दर निश्चित करण्यासाठी एक समिती देखील स्थापन केली होती, जी आज आपला रिपोर्ट जाहीर करणार आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरला पुन्हा एकदा एलपीजीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे अशातच जागतिक बाजारपेठेत गॅसच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे वाहनचालकांना पुन्हा एकदा झटका बसू शकतो त्यामूळे महानगरांमध्ये सीएनजीच्या दरात वाढ करू शकतात, अशी शक्यता आहे तसेच पाईपद्वारे घरांना पुरवल्या जाणाऱ्या पीएनजीच्या किंमतीतही वाढ झाल्याचा अंदाज आहे यापूर्वीही नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
No comments:
Post a Comment