Thursday, October 13, 2022

शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी लवकरच सेवेत होणार रुजू ; मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आदेश...

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ल्राप्रकरणी एसटी महामंडळाने बडतर्फ केलेल्या 118 कर्मचार्‍रांना पुन्हा सेवेते घेण्याचे आदेश राज्र शासनाने दिले. त्यानंतर सर्व कर्मचार्‍रांनी अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत एकच जल्लोष करत आनंद व्रक्त केला.

118 कर्मचार्‍रांवर बडतर्फची कारवाई
ऐन दिवाळीत संपावर गेलेल्या एसटी कर्मचार्‍रांनी लालपरीचे चाक थांबवले. सर्व स्तरावर याचा परिणाम झाला. परिवहन मंडळ देखील आर्थिक खाईत ढकलले गेले. एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण व्हावे, या प्रमुख्र मागणीसाठी तब्बल 6 महिने एसटी संप सुरु होता. दरम्यान, एसटी कर्मचार्‍रांनी थेट शरद पवार यांच्या घरावर धडक दिली त्यामुळे 118 कर्मचार्‍रांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली होती. राज्यात सत्ता परिवर्तन होताच, एसटी संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचार्‍रांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्रमंत्री एकनाथ शिंदे यानी दिले. त्यामुळे कर्मचार्‍रांना आठ महिन्यानंतर पुन्हा पहिल्याच जागी आणि त्याच पदावर कामावर रुजू केले जाणार आहे.

अ‍ॅड. सदावर्तेंर्च्रा घराबाहेर जल्लोष -
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कर्मचार्‍रांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर जल्लोष साजरा केला. कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्ष अ‍ॅड. जयश्री पाटील या जल्लोषात सहभागी झाल्रा होत्या. दरम्यांन, मागील सरकार आणि माजी मुख्रमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर यावेळी प्रचंड टीका झाली. तर गुरुवारपासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचार्‍रांनी विद्यमान मुख्रमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारचे आभार मानले.

No comments:

Post a Comment