वेध माझा ऑनलाइन - साताऱ्यात दांडिया संपल्यानंतर तिथून गाडी काढताना दुचाकीचे चाक पायावरून गेल्याने दोन गटात शाब्दिक चकमक उडाली, वादही झाला, यानंतर त्याचे पर्यवसन थेट फायरिंगमध्ये झाले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे दरम्यान फायर करणारे पसार झाले आहेत
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका शाळेजवळ मंगळवारी रात्री दांडिया खेळताना युवकांच्या दोन गटात वादावादी झाली. यामुळे महिला, युवतींमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन तणाव वाढला. या घटनेनंतर दोन्ही गट पांगले. मात्र या घटनेतून मध्यरात्री पुन्हा थरकाप उडाला. काही संशयितांनी ढोणे कॉलनीत हवेत फायरिंग केले. यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र यामुळे परिसर हादरून गेला.शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना जिवंत राऊंड व पुंगळ्या सापडल्या असून, त्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरू होती. संशयित सातारा शहर परिसरातील असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
No comments:
Post a Comment