वेध माझा ऑनलाइन - ओगलेवाडी येथे शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत 43 शेतकऱ्यांचा सुमारे 40 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे गुरुवारी दुपारी डबल मळा येथे ही आग लागली शेतीचे जळून नुकसान झाल्याने भरपाईची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे...
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार टेंभू रोड रेल्वे स्टेशन फाट्याच्या दक्षिण बाजूस डुबलमळा आहे गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हनुमंत जगताप यांच्या शेतातील विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट झाल्याने त्यांच्या उसाला आग लागली वाऱ्याने ही आग डुबल मळा वनवे मळा गोवारेच्या हद्दीपर्यंत पसरली घटनेची माहिती मिळताच कराड पालिकेच्या अग्निशामकच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या या दलाने डुबल मळ्याच्या उत्तरे कडील आग आटोक्यात आणली मात्र दक्षिण व पश्चिम बाजूकडील आग विझवण्यात अपयश आले.. तब्बल तीन तास आगीचे तांडव सुरू होते या आगीमध्ये 43 शेतकऱ्यांचा सुमारे 40 एकर ऊस जळून खाक झाला.. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सचिव रामकृष्ण वेताळ माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी मंडलाधिकारी विनायक पाटील शेतकरी उपस्थित होते
दरम्यान वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच लवकरच निरीक्षकांकडून पुढील कारवाई सुरू करण्याचे उपकार्यकारी अभियंता अमित आदमाने यांनी सांगितले मात्र जोपर्यंत नुकसान भरपाईचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत वीज पुरवठा सुरू करून देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले गरज पडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला
No comments:
Post a Comment