Friday, October 14, 2022

मला राजकारणात जायचे असते, तर कधीच गेलो असतो...तुम्ही देशाचे भविष्य आहात...अभिनेते नाना पाटेकर यांच्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद...

वेध माझा ऑनलाइन - मला राजकारणात जायचं असत तर मी कधीच गेलो असतो... मला सत्ताधार्यांना  प्रश्न विचारण्याचा जो अधिकार आहे तो महत्वाचा आहे, परंतु तुम्ही एखाद्या मंत्र्याला काही मागता तेव्हा तो अधिकार तिथं संपतो... कोण लहान कोण मोठा असे विचार करू नका... दिलेला शब्द पाळा... कोणी तुम्हाला जात धर्म यामध्ये अडकवत असेल तर त्यात अडकू नका... तुम्ही देशाचे भविष्य आहात... असे सांगत अभिनेते नाना पाटेकर यांनी आज येथील स गा म कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला

येथील स गा म कॉलेजमध्ये  युवा महोत्सवाच्या निमित्ताने ते आज येथे आले असता त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद साधला यावेळी त्यांना विद्यार्थी वर्गातून प्रश्नही विचारण्यात आले त्याची त्यांनी आपल्या हटके स्टाईलने मनमुराद उत्तरे देत विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन देखील केले

ते म्हणाले सध्या आजूबाजूची परिस्थिती पहिली तर यापुढे आशेने पहावे असे फक्त विद्यार्थीच आहेत तुम्हीच देशाचे भविष्य आहात तुंम्हि ठरवलं पाहिजे काय करायचे... मात्र तुम्हाला काय नाही करायचं... हेही ठरवता आलं पाहिजे... असा सल्लाही नाना पाटेकर यांनी दिला
या महाविद्यालयात शिक्षणाचे मोठे काम चालू आहे याचा खरच अभिमान वाटतो मी आपला आभारी आहे असे म्हणताना त्यांनी प्राचार्य राजमाने यांचे व त्यांनी राबवलेल्या धोरणांचे विशेष कौतुकही केले

No comments:

Post a Comment