वेध माझा ऑनलाईन - एमसीए म्हणजे मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात येत आहे का? असा संशय महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पटोलेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे बोट दाखविले आहे. नाना पटोलेंनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे म्हंटले आहे.
सध्या मुंबईत एमसीएची निवडणूक सुरु आहे. ही निवडणूक म्हणजे पैश्यांच्या खजिन्याची निवडणूक आहे. एमसीए म्हणजे पैशाचा खजिना. याच पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात आता राजकारण सुरु आहे. एक दोन नेत्यांनी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या मागणीला एमसीएच्या निवडणुकांचा वास येत आहे. असे मला निश्चितपणे वाटत असल्याचे नाना पटोले म्हणाले.मला कोणावर आरोप करायचा नाही. एमसीएमध्ये जे काही सुरु आहे, त्यावर मी बोलतो आहे.महाराष्ट्रात आतापर्यंत तीन निवडणुका झाल्या. त्यात एकही निवडणूक बिनविरोध झाली नाही.एमसीएच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा असा चमत्कार घडतो आहे.त्यामुळे याला नक्कीच एमसीएच्या निवडणुकीचा वास आहे. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध झाली,तर त्याला आमचा विरोध नाही. बाकी जनता सूज्ञ आहे, असे नाना पटोले म्हणाले.
No comments:
Post a Comment