Saturday, October 8, 2022

रान गव्याला इलेक्ट्रिक करंट देऊन मारले ; जेसीबी ने खड्डा काढून पुरले ; दोन जणांना वन विभागाने केले जेरबंद

वेध माझा ऑनलाइन - रानगव्याला चक्क इलेक्ट्रिक करंट देऊन मारले व त्यानंतर जेसीबीच्या साह्याने जमिनीत खड्डा खोदून त्याला  पूरले या गुन्ह्याप्रकरणी ढेबेवाडीतील दोन जणांना वन विभागाने जेरबंद केले आहे

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार मोजे घोटेघर पैकी ढेबेवाडी तालुका जावली या गावच्या हद्दीत गवा या वन्यप्राण्यास विजेचा करंट देऊन त्याला मारून जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदून त्याला पुरून टाकल्या प्रकरणी घोटेघर पैकी ढेबेवाडी येथील धोंडीबा बाळू ढेबे व मारुती धोंडीबा ढेबे यांना वनविभागाने जेरबंद केले आहे या गव्याला मारण्यासाठी वापरलेली बाइंडिंग वायर सर्विस वायर वन अधिकाऱ्यांनी जप्त केली असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे सदरची कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनसंरक्षक सोनवले मेढा वनपरिक्षेत्र अधिकारी रंजन सिंह परदेशी वन परिमंडळ अधिकारी श्रीमती आर एस शेख वनपाल आर एस शिंदे वनरक्षक कुमारी एस पी शेळके आर ए परधाने वनपाल आर व्ही काकडे वनरक्षक व्ही ए शिंदे यांनी केली दरम्यान, दोन्ही आरोपींना न्यायालयाने वन कोठडी दिली आहे

No comments:

Post a Comment