वेध माझा ऑनलाइन - अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशातच ऋतुजा लटकेंना आपल्याकडे वळवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे. अशातच ऋतुजा लटके शिंदे गटात गेल्यास ठाकरे गटानंही 'प्लॅन बी' तयार ठेवला आहे. ठाकरे गटाकडून दुसरा उमेदवार देण्याची तयारी सुरु झाली आहे. ऋतुजा लटके आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या चर्चेनंतर ठाकरे गट सावध झाला आहे. त्यामुळे अंधेरीतील दुसऱ्या एका शिवसैनिकाला तिकीट देण्याची तयारी ठाकरे गटानं सुरु केली आहे.
ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटात आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंची ही नवी रणनीती असल्याचं कळतंय. अशातच ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्र्यांना भेटल्याची चर्चांना उधाण आलं आहे. 5 दिवसांपूर्वी वर्षा निवासस्थानी भेट झाल्याची चर्चा सध्या सगळीकडे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ऋतुजा लटके शिंदेंना समर्थन देण्यार की, काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. अशातच ऋतुजा लटके शिंदे गटात सामील झाल्या तर नवा पर्याय काय? अशी चाचपणी ठाकरे गटाकडून सुरु झाली आहे. तसेच, ऋतुजा लटकेंनी शिंदे गटात सामील झाल्यास ठाकरे गट नवा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
No comments:
Post a Comment