वेध माझा ऑनलाइन - स्व. पी. डी. पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीतून कराड शहराची विकासाकडे चालू झालेली प्रगती उत्तरोत्तर वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.कराड शहरातील प्रलंबित मंजूर विकास कामांचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत हिंगमीरे, माजी नगरसेवक सौरभ पाटील, माजी नगरसेविका सौ. पल्लवी पवार, माजी नगरसेवक वैभव हिंगमीरे, माजी नगरसेवक सुहास पवार, शिवाजी पवार, अखतर आंबेकरी, सतीश भोंगाळे, राकेश शहा, राहुल खराडे, उदय हिंगमीरे, विवेक हिंगमीरे, सचिन वास्के, सुरेश रैनाक, अशपाक मुल्ला, आनंदराव गायकवाड, एस. एम. पाटील, जब्बार पटेल, शरीफ मुल्ला, दीपक गायकवाड, रवी पाटील, भास्कर मोहिते, किरण पाटील, अनिल जोशी, महेश पवार, प्रताप भोसले, व्ही. के. थोरात, वाहिद मुल्ला, डॉ. विजय माने, डॉ. जेठमलाणी, उमेश घेवारी, प्रतीक जाधव, विशाल चव्हाण, सुहास बाबर, विनोद चव्हाण, अशोक निकम, अमृत वास्के, जितेंद्र नवाळे, अभय देशमुख, अजिंक्य जाधव, दीपक चिंगळे, स्वप्निल चव्हाण, प्रकाश वास्के, सुजय मोहिते, अभय कदम, संदीप कोडगुले, प्रशांत धोंडुगडे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
आतापर्यंत शहरात जुना प्रभाग नं. 12 नवीन प्रभाग नं. 14 मधील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यामध्ये कराड नगरपरिषद हदीतील पेठ शनिवार, कार्वे नाका येथील खाशाबा जाधव चौक ते मार्केट यार्ड गेट नं 5 पर्यंतच्या रस्तावर पुर्व बाजुस आरसीसी गटर बांधणे, कराड नगरपरिषद हदीतील पेठ शनिवार बनपुरकर कॉलनी मधील प्रजापिता ब्रम्हकुमारी इमारती पासुन फायनल प्लॉट नं. 467/1 पर्यंत बंदिस्त आरसीसी गटर बांधणे, कराड नगरपरिषद हदीतील पेठ शनिवार बनपुरकर कॉलनी मधील फायनल प्लॉट नं. 467/1 चे उत्तरेस नगरपालिका गटर पर्यंत बंदिस्त आरसीसी गटरचे काम, कराड नगरपरिषद हदीतील पेठ शनिवार मार्केट यार्ड येथील गेट नं. 5 समोरील साई शॉपी ते ॲड. धुमाळ यांचे घरापर्यंतचा रस्ता कारपेट करणे आदी कामांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment