Saturday, October 8, 2022

राहुल गांधी म्हणतात; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता ; फडणवीसांनी घेतला राहुल गांधींचा समाचार...

 वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता, असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केले आहे. भारत जोडो यात्रेला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. राहुल गांधी यांनी आरएसएस आणि सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 


राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये आली आहे. या यात्रेला 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झालाय. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी तुमकुरुमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. ते म्हणाले की,  माझ्या माहितीनुसार आरएसएस इंग्रजांची मदत करत होते. तसेच सावरकर यांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता. हे एतिहासिक तथ्य आहे की, स्वातंत्र्याच्या लढाईत भाजप कुठेही दिसणार नाही. हे सत्य भाजपच्या नेत्यांनी मान्य करावं. 
 काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांविरोधात बंड केले. अनेक वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, वल्लभ भाई पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला, असे राहुल गांधी म्हणाले. द्वेष पसरणारे व्यक्ती कोण आहेत आणि ते कोणत्या समाजातून आले, याचा काहीही फरक पडत नाही.  द्वेष आणि हिंसा पसरवणे हे देशाविरोधी कार्य आहे. आम्ही त्या प्रत्येक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात लढणार आहोत, असेही राहुल गांधी म्हणाले. 

राहुल गांधींचा फडणवीस यांनी घेतला समाचार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. राहुल गांधी यांना इतिहास माहित नसल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 
राहुल गांधी यांनी पुन्हा आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे. राहुल गांधी यांचा मी निषेध करतो. सावरकर यांच्या मागे मोठ्या प्रमाणातील भारतातील जनता होती. जाणीवपूर्वक सावरकर यांना अपमानित केलं जात आहे.  अंदमानच्या काळकोठडीत सावरकर यांनी शिक्षा भोगली आहे. यामध्ये सावरकर यांचं वेगेळेपण यासाठी की त्यांच्यामुळे अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा मिळाली. राहुल गांधी यांना कोणताही इतिहास माहीत नाही. माझा उद्धव ठाकरे यांना प्रश्न आहे की, ते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करणार आहेत की सर्मथन करणार आहेत? असेही ते म्हणाले



No comments:

Post a Comment