Friday, October 7, 2022

कोयना धरणाचे चाैथ्यांदा दरवाजे उचलले ; 3 हजार 154 क्युसेक्स विसर्ग सुरू...

वेध माझा ऑनलाईन - कोयना धरण क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आज सकाळी 8 वाजता धरणातून 2 वक्र दरवाजे 1 फुटाने उघडून 3 हजार 154 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सध्या धरणात 104.90 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. तर पायथा विद्युत गृहातून 1050 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरण व्यवस्थापनाने चाैथ्यांदा धरणाचे दरवाजे उचलले आहेत.

कोयना व कृष्णा नदीपात्राच्या पाणी पातळीत घट झालेली आहे.  परंतु पावसाचा जोर मंदावल्याने नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाली आहे. परंतु परतीच्या पावसाने धरणक्षेत्रात चांगलीच हजेरी लावली. कोयना धरण पायथा विद्युत गृहामधून 1050 क्युसेक्स विसर्ग चालू असलेने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 4 हजार 204 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment