वेध माझा ऑनलाइन - शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने 42 व्या सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सव शुक्रवार दिनांक 14 रोजी सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात संपन्न होत आहे यावेळी जेष्ठ अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर हे युवकांशी संवाद साधणार आहेत..
या युवा महोत्सवाचे प्रमुख अतिथी नाना पाटेकर असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा युवा महोत्सव संपन्न होत आहे या युवा महोत्सवात दिनांक 14 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत नृत्य नाट्य संगीत कला यांची उधळण होणार आहे.. सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात संपन्न होत असलेल्या या युवा महोत्सवाला कराड पाटण परिसरातील युवा वर्गाने हजेरी लावावी असे आवाहन सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन राजमाने यांनी केले आहे
No comments:
Post a Comment