वेध माझा ऑनलाइन - ऋतुजा लटके आयुक्तांच्या भेटीसाठी कार्यालयात पोहोचल्या आहेत. महिनाभरापूर्वी त्यानी आपल्या राजीनाम्याचं पत्र दिलं होतं. याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी करण्यासाठी त्या आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत.
अंधेरी पूर्व मतदारसंघातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. ही निवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जात आहे. मात्र, ऋतुजा लटके यांनी एक महिन्यापूर्वी दिलेला राजीनाम्याचा अर्ज अजूनही BMC प्रशासनानं स्वीकारला नाही. अशात आता याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ऋतुजा लटके आता BMC च्या कार्यालयात पोहोचल्या आहेत.
ऋतुजा लटके आयुक्तांच्या भेटीसाठी कार्यालयात पोहोचल्या आहेत. महिनाभरापूर्वी त्यानी आपल्या राजीनाम्याचं पत्र दिलं होतं. याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी करण्यासाठी त्या आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत. आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या भेटीसाठी त्या वाट पाहत आहेत
No comments:
Post a Comment