Thursday, October 27, 2022

कराडात गब्बर ग्रुप व शाहू चौक मित्र परिवाराचा दिवाळी फराळ कार्यक्रम दणक्यात साजरा ; दोन्ही ग्रुपच्या सामाजिक कार्याचे मान्यवरांकडून कौतुक ;

वेध माझा ऑनलाइन - शहरातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे गब्बर ग्रुप व शाहू चौक मित्र परिवाराच्या वतीने आज दिवाळी फराळ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दोन्ही ग्रुपचे कार्यक्रम आज एकाच दिवशी साजरे झाले दोन्ही ग्रुपच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेत आमदार बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांनी या ग्रुपच्या कार्यकर्त्यांचे यावेळी भरभरून कौतुकही केले
शाहू चौक मित्र परिवाराने हा कार्यक्रम पू.ना. गाडगीळ शोरूम च्या बेसमेंटला घेतला होता तर गब्बर ग्रुपचा कार्यक्रम पंतांच्या कोटातील सारडा लॉन याठिकाणी संपन्न झाला  
कराड शहरातील सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर असणारे हे दोन ग्रुप आहेत गब्बर व शाहू चौक या दोन्ही मित्र परिवाराने कोविड काळात खूपच आदर्शवत काम करून समाजकार्याची पद्धती व आदर्श आखून देत मी-मी म्हणणार्याला तोंडात बोट घालायला लावेल एवढं उत्तुंग कार्य करून दाखवले आहे
कोविड काळात रुग्णाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देण्यासह त्या रुग्णाला ऑक्सिजन  तसेच लागलेच तर रेडमिसिव्हर व इतर लागेल ती मेडिकल हेल्प करण्यासाठी वेळप्रसंगी अक्षरशः जीव धोक्यात घालून या दोन्ही ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आहे... 
मधल्या पूरपरिस्थितीत या दोन्ही ग्रुपने पूरग्रस्तांना  मदत करण्याचे मोठे प्रयत्न करत त्यावेळी त्यांच्या स्थलांतरित होण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून मदत केल्याचे शहराने पाहिले आहे...  रुग्ण गरीब असेल तर त्या रुग्णाला स्वखर्चाने इतर जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करत त्या पेशंटचे संपूर्ण बिल भरून त्याला डिस्चार्ज घेण्यापर्यंतचे जबाबदारीचे काम देखील या ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे सर्वपरिचित आहे... 
शहराची स्वच्छता मोहीम असो , वृक्षारोपण असो, रक्तदान शिबिराचे आजोजन असो किंवा सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण उपलब्ध करून देणे असो, गरिबांना थंडीत ब्लॅंकेटचे वाटप असो... अशी एक-दोन नाही तर प्रचंड कामांची लिस्ट या दोन्ही ग्रुपच्या नावे लिहिता येईल... या ग्रुपमधील दानशूर एकत्र येऊन जी मदत करतात त्यावेळी ते स्वतःचे नाव न पुढे करता आपल्या ग्रुपच्या नावे मदत करतात ही   या ग्रुपच्या कार्यकर्त्यांची खासियत आहे...शहरात सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर असणारे हे दोन्ही ग्रुप म्हणजे कराडकरांचा अभिमान आहेत... या दोन्ही ग्रुपने आज दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी खासदार श्रीनिवास पाटील,आ बाळासाहेब पाटील यांनी या ग्रुपच्या एकूणच सामाजिक कार्याबद्दल शाबासकी देत भरभरून कौतुक केले व त्यांच्या हातून यापुढेही होणाऱ्या कार्यास शुभेच्छा दिल्या...यावेळी उपस्थित निरनिराळ्या राजकीय पक्षाच्या मान्यवरांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून एकमेकाशी मनमुराद गप्पा मारत या दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला...
यावेळी काँग्रेसचे नेते ऍड उदयदादा पाटील, पृथ्वीराज बाबांचे पुतणे राहुल चव्हाण तसेच कराड पालिकेचे गटनेते सौरभ पाटील, राजेन्द्र यादव जेष्ठ नगरसेवक अण्णा पावसकर, फारूक पटवेकर, मलकपूरच्या नगराध्यक्षा सौ नीलम एडगे, कराड व मलकपूरचे बहुतांशी आजी माजी नगरसेवक तसेच भाजपसह बहुतांशी राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment