वेध माझा ऑनलाइन - कराड शहरातील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्था ही अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने संस्थेच्या ठेवीदारानी आता दिवाळीच्या तोंडावरच शहर पोलीस स्टेशन गाठले आहे पोलिसांना या सर्वांनी मिळून निवेदन दिले आहे बऱ्याच दिवसापासून पतसंस्थेला टाळे लागल्याचे सभासद,ठेवीदारांच्या निदर्शनास आल्याने आज त्यांनी हे पाऊल उचलले आहे
पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेची चौकशी व्हावी तसेच सर्व ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत. चेअरमन संचालक भेटत नाहीत पतसंस्था बुडाली असल्याचा संशय आम्हास आहे सदर संस्थेची चौकशी करावी, प्रशासक नेमावे व ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे
No comments:
Post a Comment