Friday, October 21, 2022

दिवाळीत ट्राफिक चा नियम मोडला तरी दंड होणार नाही ;

वेध माझा ऑनलाइन - आपण गाडी चालवत असताना नेहमीच ट्रॅफिकच्या नियमांची भीती आपल्या मनात असते. अपघातांचं प्रमाण कमी व्हावं आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जावं, यासाठीच मुळात हे ट्रॅफिकचे नियम बनवले असतात. ते पाळले जावेत, म्हणून उल्लंघन केल्यास योग्य तो दंड देखील वसूल केला जातो. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळित राहण्यास मदत होते. मात्र, दिवाळीचा उत्सव म्हणून नागरिकांना गुजरात सरकारने हा दंडच स्थगित केल्याचं दिवाळी गिफ्ट दिलं आहे! खुद्द गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनीच शुक्रवारी ही घोषणा केली आहे.

नेमकी काय आहे घोषणा?
दिवाळीच्या दिवसांमध्ये नागरिकांना दंडाच्या मनस्तापातून सुटका मिळावी, म्हणून गुजरात सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगिण्यात येत आहे. हर्ष सिंघवी यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना यासंदर्भात घोषणा केली आहे. “२१ ऑक्टोबरपासून २७ ऑक्टोबरपर्यंत ट्रॅफिक नियम तोडलेत, तर त्यासाठी तुमच्याकडून कोणताही दंड वसूल केला जाणार नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या संमतीने आपण हा निर्णय घेतला आहे”, असं हर्ष सिंघवी यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment