Sunday, October 30, 2022

पोलीस ठाण्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा नाही ; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय...

वेध माझा ऑनलाइन - आज मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. पोलीस ठाण्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून देण्यात आला आहे.सरकारी गोपनीयता कायद्यामधील कलम तीन आणि दोन या कलमांचा हवाला देत हा निर्णय जाहीर केला आहे

मार्च 2018 मध्ये पोलीस ठाण्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी रवींद्र उपाध्याय नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी गोपनीयता कायद्यांतर्गत या कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. उपाध्याय हा त्याच्या शेजाऱ्यासोबत झालेल्या वादात पत्नीसह वर्धा पोलीस ठाण्यात गेला होता. त्यावेळी त्याने तक्रार नोंदवतानाच पोलीस ठाण्यातील चर्चेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवत आरोपपत्र दाखल केले. यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही कारवाई चुकीची ठरवत अर्जदार रवींद्र उपाध्यायला मोठा दिलासा दिला आहे.

No comments:

Post a Comment