वेध माझा ऑनलाइन - मराठी मुस्लिम सेवा संघ उद्धव ठाकरेंचं समर्थन करतो, असा लेख सामनामध्ये काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. ही संघटना मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मराठवाड्यात सक्रीय आहे, असा दावा या लेखात करण्यात आला होता. सामनामधल्या या लेखामधून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुस्लिम आणि मराठी मतं हवी आहेत. राजकीय स्वार्थासाठी चतुराईने शब्दांचा खेळ केला गेला आहे. भाजप मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार आणि या तुष्टीकरणाच्या राजकारणाबद्दल जागरुकता निर्माण करेल,' असं आशिष शेलार म्हणाले.
आशिष शेलार यांच्या या टीकेवर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे. 'आम्ही मराठी मुस्लिम असा उल्लेख केला आहे, त्यावरून आशिष शेलार यांनी भ्रम निर्माण केला आहे. सरसंघचालक मशिदीमध्ये इस्लाम कबूल करायला गेले होते का? आशिष शेलारांनी हे सांगावं,' असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं आहे.
पेडणेकरांविरोधात द्वेषाचे राजकारण
दरम्यान एसआरए घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी करण्यात येत आहे. पेडणेकर यांच्या बाबतीत हलकट आणि द्वेषाचं राजकारण सुरू आहे. जे भाजपला जुमानत नाहीत, त्यांच्या बाबतीत असे राजकारण केलं जात आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री सण-उत्सवात व्यस्त
मिहानमध्ये होणारा प्रकल्पही राज्याबाहेर गेला. एकूण सात प्रकल्प राज्याबाहेर गेले. मुख्यमंत्र्यांना वेळ नाही ते सण-उत्सव साजरे करण्यात व्यस्त आहेत. तर उपमुख्यमंत्र्यांना कट कारस्थानाचं राजकारण करण्यापासून वेळ मिळत नाही. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं प्रभारी चार्ज द्या, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे
'रवी राणा खरं बोलत असतील तर खोके
कोणामार्फत गेले हे स्पष्ट झालं पाहिजे. शिंदेंकडून खोके गेले का फडणवीस यांच्याकडून? हे जाहीर झालं पाहिजे. सोडून गेलेले आमदार हिंदुत्वासाठी गेले, त्या 40 जणांनी मंत्रिपद सोडून भगवी पताका घेऊन हिंदुत्वाचा प्रचार केला पाहिजे. अब्दुल सत्तार यांना एखाद्या मठाचं मठाधिपती करा,' असा निशाणा सुषमा अंधारे यांनी लगावला.
No comments:
Post a Comment