Monday, October 17, 2022

मोरगिरी ग्रामपंचायतीत झाले तब्बल 60 वर्षांनी सत्तांतर ; पाटणकर गटाला धक्का ;मंत्री शंभूराज देसाई गटाची एकहाती 7-0 अशी सत्ता...

वेध माझा ऑनलाईन - पाटण तालुक्यातील मोरगिरी ग्रामपंचायतीत तब्बल 60 वर्षांनी सत्तांतर झाले आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने पाटणकर गटाला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसला असून शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई गटाने एकहाती 7-0 सत्ता व लोकनियुक्त सरपंच पदी साै. अर्चना किरण गुरव यांनी जवळपास पावणेतीनशे मतांनी विजय मिळवला आहे. तर घाणव ग्रामपंचायत पाटणकर गटाने स्वतःकडे राखण्यात यश मिळवले. त्यामुळे दोन ग्रामपंचायतीत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. 

राष्ट्रवादीच्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वात मोरगिरी ग्रामपंचायत तब्बल 60 वर्षे सत्तेत होती. अखेर या मोरगिरी विभागातील अत्यंत महत्वाची असणाऱ्या ग्रामपंचायतीत शंभूराज देसाई यांच्या गटाने धक्का देत मोठे खिंडार पाडले. या ग्रामपंचायतीसाठी 1 हजार 258 मतदारांपैकी 985 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होती. घाणव येथे 532 मतदारापैकी 365 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.






No comments:

Post a Comment