Monday, October 17, 2022

आज कचरा घंटागाड्या शहरात फिरल्या नाहीत ; ठेकेदारांची मनमानी कारणीभुत असल्याची चर्चा ; संबंबधितांवर कारवाईं करणार ; मुख्याधिकारी डाके

 वेध माझा ऑनलाइन - रोज  सकाळी शहरातून फिरणाऱ्या कचरा घंटागाड्या आज एका जागेवरच थांबवण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने तसेच गेले दोन वर्ष बोनस न मिळाल्याने आज घंटागाड्या जागेवरच उभ्या राहिल्या असल्याचे समजले.ठेकेदारांची मनमानी हे यामागचे कारण असल्याचे समजते दरम्यान यासंबंधी दोषीवर कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले आहे.

शहरातून रोज सकाळी कचरा घंटागाडी गलोगल्ली फिरत असतात. परंतु आज केवळ नगरपालिकेच्या ठेकेदाराने आपली मनमानी केल्याने सर्व गाड्या टाॅऊन हाॅल येथे आज उभ्या राहिल्या आहेत. एकही गाडी बाहेर पडली नाही, त्यामुळे आता घरातील कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न नागरिकांच्या समोर उभा राहिला आहे. 
दरम्यान, नगरपालिका ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करणार आहे तसेच कराड शहरातील स्वच्छतेचे व कचरा गोळा करण्याचे कामही करून घेतले जाईल. नागरिकांची गैरसोय होवू दिली जाणार नाही. दोषीवर कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment