Thursday, October 6, 2022

बिबट्या डायरेक्ट घुसला घरात ; कुत्राची शिकार करण्यासाठी मागे होता पळत...पुढे काय झालं?

वेध माझा ऑनलाइन - कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे पळालेला बिबट्या थेट घरातच घुसल्याने घरातील लोकांची पाचावर धारण बसली. घरमालकाने चतुरायीने बाहेर पडत घराला कडी लावल्याने बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील हेळवाक येथे रात्री उशिरा बिबट्या एका घरात घुसल्याचा प्रकार घडला. गुरुवारी रात्री हेळवाक येथील सुधीर कारंडे यांच्या घरात घुसलेल्या बिबट्याला वन्यजीव विभागाने यशस्वीरित्या पिंजऱ्यात पकडले. कुत्र्याचा पाठलाग करणारा बिबट्या घरात घुसला. त्यानंतर घरमालकाने कुत्रा आणि बिबट्या दोघांना घरात बंद केले होते. रात्री उशिरापर्यंत वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे, संदीप कुंभार, वन्यजीव विभागाचे वनपाल, वनरक्षक तसेच रेस्क्यू ऑपरेशन पथक बिबट्याला पकडण्यासाठी कार्यरत होते. सदर बिबट्या हा लहान वर्षभराचा असून तो मागील उजव्या पायाने लंगडत आहे. या बिबट्याला विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी हलवण्यात येणार आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे 

No comments:

Post a Comment