Sunday, October 9, 2022

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन...

वेध माझा ऑनलाइन - समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं आहे.  मागील काही दिवसांपासून ते  आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयातच उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत आज मालवली.

समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर काही दिवसांपासून मेदांता रुग्णालयातच उपचार सुरू होते. 22 ऑगस्ट रोजी त्यांना मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. 1 ऑक्टोबर रोजी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
मुलायम सिंह यादव यांची प्रकृती  गंभीर होती आणि जीवनरक्षक औषधांच्या माध्यमातून त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटल, गुडगावच्या आयसीयूमध्ये तज्ज्ञांच्या सर्वसमावेशक टीमद्वारे उपचार सुरू होते.
त्यांचे कुटुंबीय त्यांना 3 महिन्यांपूर्वीच मेदांता रुग्णालयात घेवून आले होते. मेदांता रुग्णालयात पूर्ण चेकअप केल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती 2 ऑक्टोबरला सकाळपर्यंत ठीक होती. मात्र, आज उपचारदरम्यान, मेदांता रुग्णालयामध्ये मुलायम सिंह यादव यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. आजपर्यंत 3 वेळा ते उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्रिपद भुषवले होते. १९९६ ते १९९८ दरम्यान केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री सुद्दा ते राहिले होते.  त्यांच्या निधनामुळे समाजवादी पक्षावर शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment