वेध माझा ऑनलाइन - दिवाळीनिमित्त राज्य सरकारने अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता दिवाळी साजरी होत असतानाही अद्याप अनेक गरजूना याचा लाभ मिळालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे
आनंदाचा शिधा या सरकारच्या दिवाळी किटमध्ये चार वस्तूंचा समावेश आहे. गोरगरिबांना शिंदे फडणवीस सरकारने शंभर रुपयात हे कीट उपलब्ध केले आहे. त्यामुळे गरिबांच्या आनंदाचे वातावरण आहे परंतु दिवाळीचा पहिला दिवस असताना अद्याप हे किट कराड पुरवठा शाखेपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात दुकानदारांकडे हे कीड जायला अद्याप अजून वेळ लागणार असून दिवाळी सुरू झाली तरी हे किट गोरगरिबांना मिळालेले नाही
गोडेतेल न आणल्याने या आनंदाची शिधा किटचे अद्याप वाटप करण्यात आलं नाही अशी माहिती मिळत आहे म्हणून लोक अद्याप या शिद्यापासून वंचितच राहिले आहेत. दिवाळी असून अजूनही अनेकांना शिधा वाटप न झाल्याने गरिबांची एकप्रकारे चेष्टाच झाल्याची प्रतिक्रीया यानिमित्ताने उमटत आहे
No comments:
Post a Comment