वेध माझा ऑनलाइन - एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस दलातील महेश मारुती मगदूम असे संशयित पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, सातारा येथे पोलिस दलाची 48 वी कोल्हापूर परिशेत्रिय क्रीडा स्पर्धा 2022 नुकतीच संपली. या स्पर्धेत सहभागी असलेला कोल्हापूर पोलीस दलातील स्पोर्ट्समन संशयित आरोपी महेश मगदूम हा आहे. तो कबड्डीपटू आहे. त्याची प्रो कबड्डी लीगमध्ये देखील त्याची निवड झालेली होती. आता त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे सातारा ते कराड प्रवासा दरम्यान हा प्रकार घडला आहे
No comments:
Post a Comment