Saturday, October 8, 2022

चंद्रकांत दादांना सुसंस्कृतपणा आहे की नाही... आई-वडिलांना शिव्या द्या पण पंतप्रधान मोदी व शहा यांना काही म्हणू नका या वक्तव्याचा अजितदादांकडून समाचार ;

वेध माझा ऑनलाइन -  आई-वडिलांना शिव्या द्या पण पंतप्रधान मोदी व शहा यांना काही म्हणू नका असे वक्तव्य करणे दुर्देवी आहे. हे वक्तव्य म्हणजे ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री केल्याने ते नाराज आहेत, अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत शहरातील विविध समस्यांवर बैठक घेतली.दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य केल्यामुळे सुसंस्कृतपणा आहे की नाही याची शंका येते. स्वत:च्या आई वडिलांबाबत असे वक्तव्य करणे म्हणजे ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ आहे असेही ते चंद्रकांतदादांबद्दल यावेळी म्हणाले आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, आपण एखाद्या संविधानिक पदावर असल्यानंतर अशा पद्धतीने बोलणे चुकीचे आहे. चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य केल्यामुळे सुसंस्कृतपणा आहे की नाही याची शंका येते. स्वत:च्या आई वडिलांबाबत असे वक्तव्य करणे म्हणजे ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ आहे.

 काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील…
दरम्यान, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गुरुवारी पुण्यामध्ये पालकमंत्री झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
भाजपाच्या या सत्कार समारंभात बोलताना चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत एक विधान केले.मोदी आणि शाह यांना शिव्या घातलेल्या चंद्रकांत पाटलांना चालणार नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल...पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चंद्रकांत पाटलांना चालणार नाही असे एका नेत्याने आपल्याबद्दल शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सांगितल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केला होता.

No comments:

Post a Comment