वेध माझा ऑनलाइन - बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक अपघात घडला असल्याचं समोर आलं आहे. अमिताभ यांच्या पायाची नस कापली गेली, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. अमिताभ यांनी ब्लॉगवर अपघाताची माहिती शेअर केली आणि सांगितले की रक्त थांबवण्यासाठी काही टाके देखील लावले आहेत. ही बातमी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बातमी समोर आल्यापासून अमिताभ यांचे चाहतेही चिंतेत आहेत. अमिताभ लवकर ठीक व्हावेत अशी प्रार्थना करत आहेत.
रविवारी KBC च्या पुढच्या एपिसोडचे शूटिंग करत असताना त्यांचा अपघात झाला. अमिताभ यांचा पाय कापला गेला. अभिनेत्याच्या पायाच्या मागची नस कापली गेली. त्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांना त्यांच्या पायाला टाके घालावे लागले. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, "धातुच्या धारदार तुकड्याने डावा पाय कापला आणि नस कापली गेली. नस कापली की रक्त अनियंत्रित होते. मात्र कर्मचारी आणि डॉक्टरांच्या टीमने वेळीच केलेल्या मदतीमुळे तो आटोक्यात आला असून पायाला टाके पडले आहेत. ते लवकरच बरे होऊन पुन्हा शूटिंगला सुरुवात करतील असे समजते
No comments:
Post a Comment