वेध माझा ऑनलाइन - संपत्ती नावावर करून घेण्यासाठी पोटच्या पोराने बापाला रिवाल्वरचा धाक दाखवला व जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उंब्रज येथे घडली आहे याबाबत मुलगा सून नातू नातसुन यांच्यासह नऊ जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतःच्या बापाला संपत्ती नावावर करून घेण्यासाठी मुलगा सून नातू नातसुनेसह अन्य पाच ते सहा जणांनी रिवाल्वरचा धाक दाखवून जबर मारहाण केली तसेच संपत्तीचे बेकायदेशीरपणे कुलमुखत्यार पत्र व बक्षीस पत्र करून घेतल्याची तक्रार उंब्रज येथील प्रल्हाद गणपती घुठे यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल केली आहे...नितीन घुटे वंदना घुठे शुभम घुटे टीना घुटे यांच्यासह उत्तम आनंदा केंजळे कल्याण खामकर गणेश पोतेकर संदीप पोतले दिगंबर माळी अशी संशयित आरोपींची नावे आहेत...
प्रल्हाद घुठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते स्वकष्टार्जीत नीतीराज या बंगल्यात राहण्यास असून या ठिकाणी मुलगा नितीन हा वारंवार तुमची सर्व संपत्ती माझ्या नावावर करा असा तगादा लावत होता तसेच सर्व मिळकती हडपण्याच्या उद्देशाने बक्षीस पत्र द्यावे या हेतूने मुलगा सून नातू नातसून यांनी संगनमताने आपणास खोलीत कोंडून ठेवून मुलगी जावई नातेवाईकांना भेटण्यास मज्जाव केला.. तसेच उपाशीपोटीही ठेवले जात होते मुलगा नितीन याने बक्षीस पत्र करून देण्यासाठी रिव्हॉलवर घेऊन दमदाटी केल्याचा दावा तक्रारी द्वारे करण्यात आला आहे.. यावेळी इच्छेविरुद्ध मला मारहाण करून माझी मालमत्ता जबरदस्तीने घेण्यासाठी भाग पाडून कुलमुखत्यार पत्र हे मुलगा यांनी स्वतःचे नावे व बक्षीस पत्र नातू शुभम घुठे याचे नावे बेकायदेशीर पद्धतीने करून घेतले असे तक्रारीत म्हटले आहे.. याबरोबरच उत्तम केंजळे शुभम घुटे व ड्रायव्हर कल्याण खामकर यांनी माझ्या संपूर्ण प्रॉपर्टी चे ओरिजनल फाईल आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड चेक बुक पासपोर्ट साईजचे फोटो या वस्तू नेले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे अधिक तपास करीत आहेत
No comments:
Post a Comment