वेध माझा ऑनलाइन - शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागची संकटे काही केल्या दूर होताना दिसत नाहीत. मागच्या 3 महिन्यापूर्वी पक्षातील आमदार फुटले त्यानंतर काही महिन्यांनी पक्षाचे चिन्ह गेले आता जे पक्षाला चिन्ह मिळालं त्यावरही एका पक्षाने दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले होते परंतु या चिन्हावर आता आक्षेप नोंदवण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 'मशाल' वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मागच्या 3 महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांना शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षाच्या चिन्हावर दावा केल्याने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवून टाकले. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 'मशाल' हे नवीन चिन्ह देण्यात आलं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना तलवार ढाल हे चिन्ह देण्यात आलं. आता आता उद्धव ठाकरे यांच्या चिन्हावर समता पार्टीकडून दावा करण्यात येत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने आक्षेप नोंदवल्याने ठाकरे गटासमोर मोठे संकट येऊन ठेपले आहे. ठाकरेंची मशाल ही आमच्या पार्टीच्या चिन्हासारखीच दिसत असल्याचा दावा समता पार्टीने घेतला आहे. मतदान यंत्रावर ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये चिन्ह असते. त्यामुळे दोन्ही चिन्ह सारखीच दिसू शकतात, असा दावा समता पार्टीने केला आहे यामुळे निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
याप्रकरणी ईमेलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे चिन्हावर समता पार्टीने हक्क सांगितल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात 2004 मध्ये समता पार्टीची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत ठाकरे यांना धगधगती मशाल हे चिन्ह दिले आहे. दरम्यान, असं असलं तरी यामुळे ठाकरे यांची मशाल हे चिन्ह पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
दरम्यान यावर समता पार्टीकडून यावर चिन्हावर दावा करण्यात आला आहे. दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडीस यांच्या पक्षातील एका नेत्याने याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, आमच्या पक्षाकडे 1994 पासून हे चिन्ह आहे. हे चिन्ह निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात शिवसेनेला दिले आहे. अंधेरीची पोटनिवडणूक झाल्यावर आम्ही यावर विरोधात सुप्रीम कोर्टात याचीका दाखल करणार असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment