वेध माझा ऑनलाइन - कुणबी दाखल्याचे काम करून देण्याच्या बदल्यात पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करणारा कराड तहसील कार्यालयातील लोकसेवक एसीबीच्या जाळ्यात अडकला त्याच्याविरोधात आज कराड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला आहे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या भाचीचे कुणबी दाखल्याचे काम संबंधित अधिकाऱ्याकडून करून देतो असे सांगून पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी कराड तहसील कार्यालयातील विक्रम वसंत शिवदास राहणार मालखेड सध्या ढेबेवाडी फाटा मलकापूर यांच्यावर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.. तक्रारदाराच्या भाचीचा कुणबी जातीचा दाखला काढून देण्यासाठी स्वतः करता व संबंधित अधिकाऱ्यांकरता पन्नास हजार रुपये लाचेची मागणी शिवदास यांनी केल्याचे निष्पन्न झाले या अनुषंगाने सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. कराड शहर पोलीस ठाण्यात शिवदास यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव पोलीस उपाधीक्षक सुजय घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी पोलीस अंमलदार संजय कलगुडगी धनंजय खाडे प्रीतम चौगुले यांनी केली
No comments:
Post a Comment