Monday, October 10, 2022

धनुष्यबाण चिन्ह गोठवल ; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया...म्हणाले ; एकनाथ शिंदेंबाबत महाराष्ट्रात प्रचंड संताप ;

वेध माझा ऑनलाइन - केंद्रीय निवडणूक आयोगाने चार तासांची बैठक घेऊन शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना आता नवं चिन्ह आणि नाव घ्यावं लागणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या संपूर्ण प्रकरणावर पहिल्यांदाच संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, की 'कदाचित नवीन चिन्ह हे शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. असं काही घडल्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वी इंदिरा गांधी देखील अशाच परिस्थितीतून गेल्या होत्या. काँग्रेसचे तीनवेळा चिन्ह गोठवले होते, तर जनता दलाचेही चिन्ह गोठवले होते,' असं ते यावेळी बोलताना म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले, की 'नावात काय आहे. शिवसेना नाव गोठवले तरी शिवसेना तीच आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक संताप व्यक्त केला जात आहे', असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला. संजय राऊत कोर्ट परिसरात पत्रकारांसोबत गप्पा मारताना याबाबत बोलले.

'




No comments:

Post a Comment