वेध माझा ऑनलाइन - सभासद व बँकेचा सुसंवाद व्हावा या उद्देशाने कराड अर्बन बँकेने विभागवार सभासद संपर्क व प्रशिक्षण मेळावे आयोजित केले होते त्याला सर्वच ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे बँकेचे हे अभियान उत्साहात व यशस्वी पार पडले असल्याचे अध्यक्ष सुभाष एरम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले नेट बँकींगसंदर्भात रिझर्व्ह बँकेकडे आम्ही प्रस्ताव पाठवित असून रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळाल्यानंतर नेट बकींग सेवा सुरू करण्यात येणार आहे असा खुलासाही त्यांनी यावेळी सभासदांच्या माहितीसाठी केला
यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव तसेच सर्व नूतन संचालकांची उपस्थिती होती.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी, सभासदांना 5% लाभांश दिला आहे. त्याचप्रमाणे ज्या सभासदांची भागधारण रक्कम .2,500 पेक्षा कमी आहे त्या सभासदांनी किमान .2,500 चे भागधारणा करणे आवश्यक आहे असे सांगितले व ज्या सभासदांचे बँकींग व्यवहार सुरू नाहीत अशा सभासदांनी बँकींग व्यवहार सुरू ठेवावेत असे आवाहनही यावेळी केले.
बँकेने नुकताच 4500 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे,आता बँकेस 10,000 कोटींचा टप्पा पार करावयाचा असून यासाठी सभासदांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवण्याची अपेक्षा माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांनी यावेळी व्यक्त केली.
कराड अर्बन संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध...
दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराडची संचालक मंडळ सन 2022 ते 2027 पंचवार्षिक निवडणूक सातारा जिल्हा निबंधक मनोहर माळी यांनी नुकतीच बिनविरोध झाल्याचे जाहीर केले
गटनिहाय नव-नियुक्त संचालक मंडळ खालीलप्रमाणे-
सर्वसाधारण गट- सुभाष रामचंद्र जोशी, सुभाष शिवराम एरम, समीर सुभाष जोशी, स्वानंद प्रविण पाठक, श्रीरंग गणेश ज्ञानसागर, महिपती निवृत्ती ठोके, विजय कोंडीबा चव्हाण, विनित चंद्रकांत एरम, अनिल आप्पासाहेब बोधे, चंद्रकुमार शंकरराव डांगे, महादेव गणपती शिंदे, राहूल अरूण फासे, महिला राखीव गट - रश्मी सुभाष एरम, सुनिता दिलीप जाधव,
अनुसूचित जाती/जमाती राखीव गट- राजेश विश्वनाथ खराटे, राखीव गट - राजेंद्र नारायण कुंडले, इतर मागासवर्ग राखीव गट - शशांक अच्युतराव पालकर...
No comments:
Post a Comment