वेध माझा ऑनलाईन - राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायती निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. निकालाचा पहिला कल हातात आला आहे. आतापर्यंतच्या निकालामध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. तर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पिछाडीवर आहे. पक्षनिहाय निकालानुसार, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कडवी झुंज सुरू आहे.
18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. निकालाचा पहिला कल हातात आला आहे. 113 जागांचा निकाल हाती आला आहे.
यापैकी महाविकास आघाडी 46 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप आणि शिंदे युती सरकार हे 40 जागांवर आहे. तर भाजपने आतापर्यंत सर्वाधिक 23 जागा जिंकल्या आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी आणि बाळासाहेबांची शिवसेना 18 जागांवर आघाडीवर आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाला 15 तर काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान, नंदुरबारमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. आतापर्यंत 11 जागांचा निकाल हाती आला आहे.
भाजपा - 05
काँग्रेस - ०4
राष्ट्रवादी - 01
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट )- 01
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना - 00
दरम्यान, ठाण्यात आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत शांततेत मतदान पार पडलं. नक्षलग्रस्त गडचिरोलीतही शांततेत मतदान पार पडलं. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे. या निवडणुकीची आज मतमोजणी होतेय... निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातील 342 ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यापैकी 10 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदांची बिनविरोध निवड झाली आहे. तर एका ठिकाणी एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे 331 ठिकाणी सरपंचपदासाठी आज मतमोजणी पार पडतेय. य़ा निवडणुकीत 1339 उमेदवार रिंगणात आहेत. तर ग्रामपंचायत मधील 3490 सदस्यांच्या जागेपैकी 4, तर 712 ठिकाणी सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. डहाणू तालुक्यामधे 62 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये मुख्य लढत भाजप, शिंदे समर्थक आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये होत आहे.
No comments:
Post a Comment