वेध माझा ऑनलाइन - वेध माझा च्या दणक्यांनंतर ठेकेदार व मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यात कचरा गाडी आजच सुरू करण्याबाबत चर्चा झाल्यानंतर कर्मचार्यांना पगारासह अडव्हान्स देण्याचे सबंधित ठेकेदारांने मान्य केले त्यामुळे शहरातील कचरा गोळा करण्याचे काम लगेचच सूरू करण्यात आले.वेध माझा च्या वृत्ताची दखल घेत हा प्रश्न लगेचच सुटला यामुळे वेध माझा चे अनेकांनी फोन करून आभार मानले
दिवाळी बोनस व पगार येथील पालिका कर्मचाऱ्याना दिला नाही त्यामुळे कंत्राटी कर्मचार्यांनी आज सकाळपासुन कचरा गोळा करण्याचे काम बंद ठेवले होते. काम बंद ठेवण्याची भूमिका कर्मचार्यांनी घेतली होती.याबाबतचे वृत्त वेध माझा ने तात्काळ प्रसिद्ध करून शहरातील लोकांना याबाबत कल्पना दिली त्यानंतर शहरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या
पालिका कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, ठेकेदार यांची त्यानंतर त्वरित मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याशी चर्चा होऊन याप्रश्नी तात्काळ मार्ग काढला त्यानंतर कर्मचार्यांनी आंदोलन मागे घेत शहरातील कचरा गोळा करण्यास सुरुवात केली आहे
दरम्यान, वेध माझा च्या प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने याविषयाबाबत त्वरित हालचाल होऊन हा प्रश्न आजच्या आजच मिटल्याने वेध माझाचे शहरातील अनेकांनी फोन करून आभार मानले...
No comments:
Post a Comment