Friday, October 14, 2022

अभिनेते नाना पाटेकर स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या समाधीवर झाले नतमस्तक ; कराडात युवा महोत्सवात साधणार युवकांशी संवाद;

वेध माझा ऑनलाइन ; कराड येथे युवा महोत्सवात युवकांशी संवाद साधण्यासाठी आलेले सिने अभिनेते व नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जावून दर्शन घेतले. कराड येथे नाना पाटेकर यांचे स्वागत करण्यात आले. नाना पाटेकर प्रितीसंगम घाटावर आल्याची माहिती मिळताच नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

यावेळी त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर, सुधीर चिवटे, गणेश थोरात, कॅप्टन आशा शिंदे, प्रविण पाटील आणि नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment